travel

lockdown Diaries : केरळ - काश्मिर - केरळ | soul Marathi Blog

soulMarathi User Pic संतोष माणकापूरे May 9, 2021, 3:02 p.m. · 5 min. read
Share this
 lockdown Diaries : केरळ - काश्मिर - केरळ | soul Marathi Blog

आपल्या देशात ध्येयवेड्या लोकांची काही कमी नाही. अशाच एका हट्के तरुणाची फेसबूकवर ओळख झाली... नाव "गोगूल नायर".केरळच्या एर्नाकुलम येथे राहणारा हा साधा मध्यमवर्गीय तरुण. पूर्वी एका इलेक्ट्रीक सबस्टेशन उभारणार्या कंपनीत गोगूल कॉलिटी इंजीनियर म्हणून काम करायचा. पण 2020 च्या लॉकडाऊन मधे देशातीलअनेकांप्रमाणे याचीही नोकरी गेली. 6 महिने घरीच रहावं लागलं. त्यातून तो प्रचंड डीप्रेशनमध्ये गेला. गोगूलची पत्नी शिक्षिका आहे. त्यांना दोन छोटी मुलं आहेत. या डीप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी पत्नीने त्याला कुठेतरी बाहेर फिरून यायचा सल्ला दिला. शेवटी त्याने वेगळा विचार केला अन सायकलीवरून केरळ ते काश्मिर असा प्रवास करायचा निश्चय केला.

ठरल्याप्रमाणे गोगूल दि. 16 डिसेंबर 2020 या तारखेला घरच्यांचा निरोप घेऊन बाहेर पडला. साधी जुनी विना गिअरची सायकल, सोबत गरजेपुरते लागणारे कपडे, एक स्लिपींग बैग, रात्री मुक्कामासाठी टेंट अन इतर काही आवश्यक गोष्टी आपल्या सायकलीच्या कैरीअरवर बांधून तो निघाला. एर्नाकुलमहून निघून कर्नाटक,महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलन्गाना, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश दिल्ली,पंजाबमार्गे तो काश्मिरच्या जम्मू येथे पोहोचला. बारामुला या ठिकाणीही त्याने भेट दिली.

गोरुल दररोज सरासरी 50 ते 60 किलोमीटर सायकल चालवत असे. विना गिअरची साधी सायकल अन त्यावर त्याचे 40 किलो वजनाचे साहित्य सोबत घेऊन याने एकट्याने हा पल्ला गाठला. संपूर्ण प्रवासात तो हॉटेल किंवा धाब्यावरच जेवला. सोबत नेलेल्या टेंटमधेच झोपला. नदी नाल्यावर आंघोळ केली. या प्रवासात त्याला अनेक चांगले मित्र भेटले. काही ठिकाणी वाईट अनुभवही आले. काश्मिर मधून तो हिमाचलच्या मनाली येथेही गेला. तिथून पठाणकोट दिल्ली मार्गे परत तो आपल्या गावी निघालाय.आपल्या मुंबईलाही त्याने भेट दिली. तो कोल्हापूरवरून जात असताना त्याला भेटायची खूप इच्छा होती, पण लॉकडाऊनमुळे ही भेट होऊ शकली नाही. मी त्याच्याशी फोनवर बोलत होतो तेव्हा तो अजून कर्नाटकातील मुरडेश्वर येथे होता. आठवडाभरात तो आपल्या केरळमधील मूळ गावी पोहोचेल.

आजच्या तारखेपर्यंत त्याने 7200 किमी अंतर सायकलीवरून पार केलंय. आणखी 800 किलोमीटर होईल म्हणाला. पाच महिण्यात त्याने एवढा मोठा पल्ला गाठलाय. या प्रवासात त्याचे जेवणाखाण्यावर व इतर किरकोळ मिळून 18000/- रू खर्च झालेत. मित्रांनो एक खास गोष्ट नमूद करावीशी वाटते... गोगूलने दहावीत असताना शेवटची सायकल चालवलेली. त्यानंतर थेट या प्रवासातच. त्यासाठी त्याने ना कोणती तयारी केली, ना कोणतं प्रशिक्षण घेतलं. जबरदस्त इच्छाशक्ती अन पत्नीच्या पाठबळावरच आपण हा पल्ला गाठल्याचं तो प्रामाणिकपणे नमूद करतो. ध्येयवेड्या गोगूलला मानाचा मुजरा.

हॅट्स ऑफ गोगूल....!!!

-संतोष माणकापूरे

Become a member
Get the latest news right in your inbox. We never spam!
Read next

Lohagad Fort Trekking

abc March 19, 2021, 12:21 p.m. · 2 min read
soulMarathi

· min read
Soul Marathi

· min read

· min read