महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता, एप्रिल महिन्याअखेरीस पावसाचा अंदाज

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्या मध्ये महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एप्रिलच्या शेवटाला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकणातील (Konkan) तापमान कोरडे राहणार, मुंबई-ठाण्यातही परिणाम
कोकणातील तापमान पुढील दोन-तीन दिवस कोरडे राहण्याची शक्यता आहे. दमट हवा, अधिक आर्द्रता आणि तापमानामुळे कोकणात अधिक उष्ण आणि अस्वस्थ वातावरण राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) देखील परिणाम जाणवण्याचा अंदाज आहे, ज्यात तापमान जरी कमी असलं तरी आर्द्रतेमुळे अधिक तापमान वाटू शकतं.
विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज
विदर्भात (Vidarbha) मध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बुलढाण्यात वादळी पावसाची हजेरी
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद परिसरात काल दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.