अवकाळी पाऊस : मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा आज हलका पाऊस पडण्याची शक्यता; तर विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज


भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रातील मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे विदर्भापासून, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळेच आज विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली
पावसाळ्यात कमी पावसाचा अंदाज
एप्रिल महिन्यात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत एल निनोचा प्रभाव 80 ते 85 टक्क्यांदरम्यान असेल. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची चिन्हे आहेत.