बंगळुरूनचा लखनऊ वर 18 धावांनी विजय :अमित मिश्राची झुंजार खेळी, शर्मा-हेझलवूडच्या 2-2 विकेट | soul Marathi Blog

आयपीएल-16 मधील 43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) लखनऊ सुपर जायंट्सला (LSG) 18 धावांनी हरवले. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात बंगळुरूने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 9 गडी गमावून 126 धावा करत लखनऊला विजयासाठी 127 धावांचे आव्हान दिले. याचा पाठलाग करताना लखनऊला 19.5 षटकांत 10 गडी गमावून 108 धावांपर्यंतच मजल मारता आली.

लखनऊकडून कृष्णप्पा गौतमने सर्वाधिक 23 धावा केल्या. त्यानंतर अमित मिश्राने 19 धावांची झुंजार खेळी केली. तर कृणाल पंड्याने 14, मार्कस स्टॉयनिस व नवीन-उल-हकने प्रत्येकी 13 धावा केल्या. बंगळुरूकडून जोश हेझलवूड आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

जगभरातील बातम्या मिळवा व्हाट्सअँप वर ❤️

JOIN US ON WHATSAPP
JOIN