रोहित शर्माला क्लीन बोल्ड देण्याचा अंपायरचा निर्णय चुकीचा? Video पाहून थक्क व्हाल! | soul Marathi Blog

रोहित शर्माला बाद ठरवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. व्हिडीओ एकदा पाहाच.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा ४२ वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. यशस्वी जैस्वालच्या वादळी शतकाच्या जोरावर राजस्थानने मुंबईला २१३ धावांचं आव्हान दिलं. त्यानंतर मुंबईचा सलामीवीर फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले. पहिल्या षटकात चांगली सुरुवात केल्यानंतर संदीप शर्माच्या गोलंदाजीवर मुंबईला मोठा धक्का बसला. कारण रोहित शर्माला संदीप शर्माने तीन धावांवर क्लीन बोल्ड केलं.

परंतु, व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून बर्थ डे बॉय रोहित शर्मा बाद झाला नसल्याचं समोर आलं आहे. विकेटकीपर संजू सॅमसनच्या ग्लोव्हजा स्टंपला स्पर्श झाल्याने बेल्स खाली पडल्या, असं ट्वीटरवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळं रोहित शर्मा बाद झाल्यानं वाढदिवशीच रोहितला भन्नाट गिफ्ट मिळालं, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

जगभरातील बातम्या मिळवा व्हाट्सअँप वर ❤️

JOIN US ON WHATSAPP
JOIN