शरद पवार: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची केली घोषणा | soul Marathi Blog

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत आहोत, अशी घोषणा आज केली.

तसेच, यापुढे आपण कुठलीही निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी आज झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले आहे.

शरद पवार यांनी कार्यक्रमात निवृत्ती ची घोषणा करताच समोर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला.तसेच अनेक नेते व कार्यकर्ते याना अश्रू अनावर झाले.

धनंजय मुंडेंसह काही नेत्यांनी तर व्यासपीठावर जात शरद पवारांचे पाय धरले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली.

नेते व कार्यकर्त्यांच्या या भूमिकेवर शरद पवार आता काय बोलतात? आपला निर्णय मागे घेणार का?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

जगभरातील बातम्या मिळवा व्हाट्सअँप वर ❤️

JOIN US ON WHATSAPP
JOIN