सरपंच : आकाश दौंडे | soul Marathi Blog

माझ्या पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे गावाचा हा तरुण, आकाश दौंडे. पुणे विद्यापीठात मास कम्युनिकेशनच्या पदवीच शिक्षण घेतोय. इतर गावाच्या गावपुढा-यांचं अद्याप हार तुरे गुलाल उधाळणं आणि फोटोसेशनचं सुरुय तरच भावड्या लागलाय कामाला.

लाँकडाऊनच्या काळात गावाकडे आला, गावाच्या भल्यासाठी काही तरी करण्याच्या विचारात असतांना ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, मग गावाच्या निवडणुकीत मित्राला बरोबर घेवून निवडणूकीच्या रिंगणात उतरला आणि मित्राबरोबर मताधिक्याने निवडुन ही आला.

 सरपंच : आकाश दौंडे | soul Marathi Blog

सरपंचपदाच्या निवडीची वाट न बघता, निवडणूकीचा निकाल लागला की लगेच पठ्ठ्यांने गावात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. त्यात नेत्र तपासणी करुन गरजू रुग्नांना नाममात्र शुल्क भरुन चष्माचे वाटप केले, गावा बाहेरच्या वस्तीवर अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेला हात पंप गावाक-यांने सहकार्यांने सुरु केला, जिल्हा उद्योग केंद्राला भेट देवून पुढील कामाची रूपरेषा ठरवली.

दरम्यान सरपंच निवडीत गावाक-यांने उपसरपंचपदाची माळ ह्याच्या गळ्यात घातलीय, मित्र संतोष दौंडे आणि इतर सदस्याच्या सहकार्याने हा आता गावाचा कारभार पाहाणार आहे. चळवळीतली ,फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांने चालणारी आपणासारखी कृतीशील माणसं नक्की काही तरी चांगल करुन दाखवतील. आकाशदा, संतोषदा, आम्हाला खुप अपेक्षा आहेत तुमच्याकडून, तुमच्या लोकसेवेच्या कार्यासाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा ...

जगभरातील बातम्या मिळवा व्हाट्सअँप वर ❤️

JOIN US ON WHATSAPP
JOIN