आजपासून स्पॅम कॉल-एसएमएस बंद होणार. स्पॅम कॉल-एसएमएस कॉल्स ओळखण्यासाठी घेणार एआय ची मदत.


देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या जियो, एअरटेल व व्होडाफोन-आयडिया यांनी स्पॅम कॉल रोखण्यासाठी त्यांच्या सिस्टिममध्ये AI आधारित फिल्टर लावले आहे. या AI filter च्या मदतीने स्पॅम मेसेज आणि कॉल्स नेटवर्कवरच ब्लॉक होतील या कंपन्या चा दावा आहे
ट्रायने सर्व कंपन्यांना ३० एप्रिलची मुदतवाढ दिली हाेती. कंपन्यांची चाचणी यशस्वी ठरल्याचे ट्रायच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नवीन नियमांतर्गत TRAI एक फिल्टर सेटअप करीत आहे. #sakal #Calls #messages #TRAI #NewRules https://t.co/e2WjmMTB6X
— SakalMedia (@SakalMediaNews) April 27, 2023
आजवर आपल्याला मोबाइलवर कॉल आल्यानंतर कळायचे की तो स्पॅम कॉल होता. नंतर आपण तो नंबर ब्लॉक करायचो. आता तो नंबर आधीच नेटवर्कवर ब्लॉक होऊन जाईल व आपल्यापर्यंत कॉल येणार नाही.
मोबाईल कॉलिंगबाबत 1 मेपासून नवा नियम! भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने घेतला पुढाकार...#MobileCallingNewRule #TRAI #MobileCallinghttps://t.co/Qb6z7cYzif
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 27, 2023
स्पॅम कॉल-एसएमएस कायमस्वरूपी बंद होतील का?
होय, मात्र सुरुवातीचे काही आठवड्यापर्यंत तांत्रिक सॉफ्टवेअर त्रुटी मुळे स्पॅम कॉल बंद न झाल्याच्या तक्रारी येऊ शकतात. मात्र स्पॅम कॉल किंवा मेसेजमध्ये तब्बल ९० टक्क्यांपर्यंत घट येईल.